भाव साठलेले
भाव साठलेले
हे भाव साठलेले वाटेन सागराशी
ओथंबल्या मनाने बोलेन सागराशी
सांगू कशास आता कोणास गूढ माझे
हे गुपित मनीचे खोलेन सागराशी
ओठावरी न येई भणंग गीत माझे
लोटून आत व्यथा गोठेन सागराशी
दारावरी न येती वाटा सुखावलेल्या
पाडेन पायवाटा आतून सागराशी
माझ्याच का कपाळी मुक्काम वादळाचा
लाटेस झेलताना झगडेन सागराशी