सौर वर्षानुभव!
सौर वर्षानुभव!
1 min
13.6K
भ्रमर सुमन वेलूचा
प्रातःकाली दव पातीचे
काजवे प्रकाश रातीला
गीत बरसती नभीचे
मेघ दाटतो थेंबाचा
सौर वर्षा मिलनाचे
माती ओली पद स्पर्शाला
ओघळती रंग इंद्रधनूचे
पाखरे बिलगती मावळतीला
झरे किनारे मुख चोचुंचे
वासरे उदरी गोठ्याला
दूध चाटती आईचे
वेचता प्राजक्त सौन्दर्याचा
ओंजळीत धन धुक्याचे
सडा सांडतो औदुंबरातुनी
परस अंगणी गंध मातीचे
तनु लाजरी वाऱ्यांची
गारवा नेसती धुंदीचे
लगबग चाले सुखनिद्रेची
स्मित ओठी मधु स्वप्नांचे