रव
रव
गुंजू दे रव शब्दांची
तुझ्या न् माझ्या मनात
बहरेल प्रेम वेल
घ्यावे सखे तू ध्यानात
अनामिक ओढ मनी
कशी या कातरवेळी
सतावते याद तुझी
अशी या सांजवेळी
उगवला नभी चंद्र
संगे घेऊन चांदणे
कधी सोडशिल सखे
तुझे सारेच बहाणे
गंध रातराणीचा हा
मना मोहरून जातो
प्रेमभाव पुन्हा वारा
सखे जागा गं करतो