शेतकरी बाप
शेतकरी बाप
बापचं शेत सारं
कसं आराटीनं घेरलं
झळा उन्हाच्या सोसून
हाती काही नाही उरलं ----||१||
कोराटिनं केलं होतं
घराच्या भवती जाळं
सुखी संसारात असून
निराशेनं धरली मुळं ------||२||
पाखरानी केला होता
राहून राहून हल्ला
नाही काहीच पिकलं
तिथं धत्तूरा फुलला -----||३||
गळून गेल अवसान
नाही उरलं काही राम
पोट गेलं खपटीला
सांगा कसं होणार काम ------||४||
आलं मुलीचं लगीन
नाही खिशामध्ये दाम
भर थंडीमध्ये त्याला
कसा फुटू लागे घाम -----||५||