Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

व्यक्त व्हा बिनधास्त.

व्यक्त व्हा बिनधास्त.

1 min
7.1K


गतकाळातील कधीच न विसरणारी आठवण 

असो की अनटचेबल मनाच्या कोपऱ्याची साठवण 

हवीहवीशी भाव - भावनांची सुंदर गुंफण 

विचार कसला करताय व्यक्त व्हा बिनधास्त ....

कथा , कविता असो की ललित , अजून काही 

लिहा काहीही ,विषय कोणताच इथे वर्ज्य नाही ...

आग्रहाचं आमंत्रण नाही की , नसण्याचं सोयरसुतक

विचार कसला करताय व्यक्त व्हा बिनधास्त ...

 

फेसबुक वरील वावर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा 

फेस बुक करा की बुक फेस करा ज्याचा - त्याचा प्रश्न 

वाटते तसे हे आभासी जग , तरीही भेटत असतात जिवलग 

विचार कसला करताय व्यक्त व्हा बिनधास्त ...

भान फक्त ठेवा होऊ नये कधी नैतिक मूल्यांची घसरण 

राष्ट्रीय एकात्मता , सर्वांचं भलं अन प्रेमाचं व्याकरण 

दुःख आपसातील वाटून घेऊ , सुखाचे क्षण इतरांनाही देऊ 

विचार कसला करताय व्यक्त व्हा बिनधास्त ...


Rate this content
Log in