Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Tragedy

3  

Shital Yadav

Tragedy

संभ्रम

संभ्रम

1 min
13.8K


हल्ली मरणं जितकं सोपं

जगणं तितकंच कठीण झालं

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


आयुष्याचे खाच-खळगे भरता

मनुष्य जन्माचे सार्थक करता

आयुष्य आता वाळवंट झालंय

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


जन्मासोबतच चिकटते जात

अमानवी रुढींमुळे होतो घात

जात्यांध विषंच पसरत आलंय

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


मूठभर स्वप्नं घेऊन उराशी

मन झेपावे उंच उंच आकाशी

स्वप्नांनांच बाजारी विकलं जातंय

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


कुठेही आज वशीलेबाजीला वाव

गुणवत्तेपेक्षा असे पैशालाच भाव

ध्येयासाठी झटणं दुर्मिळ झालंय

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


श्रेष्ठ कनिष्ठभेद आजही समाजात

समतेची भावना चेतवावी उरात

अरेरे!माणुसकीचा किती हा विलय

नेमका दोष कशाला द्यावा

कळणं मात्र कठीण झालंय ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy