Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

प्लास्टिक पिशवी

प्लास्टिक पिशवी

1 min
16.7K




माझी नि तुमची

ओळख जूनी खुप.

विविध आकार नि

रंगीत माझे रूप.


असो लहानथोर

वा बाया बापडे,

साऱ्यांना आवडे

माझे गोड रूपडे.


घर किंवा दुकाने

असो बाजार मोठा,

माझ्या हजेरीला

नव्हता कधी तोटा.


उपयोगी जरी मी

पर्यावरणास घातक.

थांबव वापर माझा

करू नको रे पातक.


सोड माझी संगत

नसता होईल दंड.

कोपला जर निसर्ग

तोही करेल बंड.


माझ्या वापराने

होईल तुझा घाटा.

तुझ्या भल्यासाठी

मला दे रे फाटा.


चालले सोडून मी

आज तुझी साथ.

ओळखशील का

भेटले जर भविष्यात?


Rate this content
Log in