Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

परतफेड

परतफेड

1 min
524



होय

भरभरुन देतोयस तू

अगदी निरपेक्ष भावनेने

मुक्तहस्ते

ओंजळ माझी भरतोयस तू.

मंजुळ कलरव पक्ष्यांचा,

ओढ्याची खळखळ,

मोराचा केका

पानांची सळसळ

दऱ्यांतून घुमनारा प्रतिध्वनी

अन् वाऱ्याचा ठेका.

कर्णमधुर निसर्गसंगीत

मनमोहक ,प्रसन्न,आल्हाददायक

लोभसवाणे इंद्रधनु रंगीत.

कुठेच न मिळणारा

अमूल्य असा प्राणवायू

तूच पुरवितो

तोही अगदी मोफत.

फळे ,फुले,पर्जन्य,औषधी,लाकूड,छाया

देऊनि करतोस

मजवरी अमाप माया.

वृक्षा,

अनंत उपकार आहेत

तुझे मजवरी

मदत तुझी नानापरी.

अन् मी.........

मी कशी करू तुझी परतफेड?

अशक्यच आहे ते.

पण मी होणार व्यक्त

करणार दोन हातांनी मदत.

तुझ्यासाठी येईन मी धावत.

लाविन रोपटी

राखीन निगा

मिळेल जिथे- जिथे जागा

करीन बचत पाण्याची

योग्य विल्हेवाट कचऱ्याची

सागरसम्पत्ति, जीवसृष्टी

हिरवीगार वनराई

जपेन प्राणपणाने

तरीही होणार ना उतराई.


Rate this content
Log in