Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

चौका दिया...!

चौका दिया...!

1 min
194



सार जग

आमच्या कडे

एकविसाव्या शतकात सुद्धा

गारुड्यांचा देश

अडाणी लोकांचा देश

गरिबांचा देश

आशिक्षितांचा देश

म्हणून पहात होते

पण

आम्ही जगाला

दाखवून दिलं

आम्ही कोण ते...!

आम्हाला

अभिमान आहे

आमच्या देशाचा

आमच्या माणसांचा

आमच्या जातीचा

आमच्या पंथाचा

आमच्या धर्माचा

आमच्या देश भक्तीचा

आमच्या संस्कारांचा

आमच्या संविधानाचा

आमच्या आत्मसन्मानाचा

आमच्या अस्मितेचा

आमच्या संकल्पाचा

आमच्या ध्येयाचा

आमच्या सहिष्णुतेचा

आमच्या सर्वधर्म समभावाचा

आमच्या एकजुटीचा

आमच्या एकतेचा

आमच्या गर्वाचा

आणि पुन्हा एकदा

सिद्ध केलं

आमची

लोकशाही

आजरामर आहे

सात्विक आहे

सदृढ आहे

सचेत आहे

सम्पन्न आहे

चिरंजीव आहे

कारण

या लोकशाहीचे

आम्ही

पाईक आहोत

सेवक आहोत

प्रेरक आहोत

खंदे कर्तव्यदक्ष सेनानी आहोत

कार्यक्षम रखवालदार आहोत

खरेखुरे वारस आहोत..

लोकशाही आमची

आम्ही लोकशाहीचे

हेच खरे सत्य आहे

म्हणून तर

सत्यमेव जयते

आमचे 

ब्रीदवाक्य आहे

सत्य आमचे 

घोषवाक्य आहे

सत्य आमचा प्राण आहे

सत्य आमचा प्राण आहे....!


Rate this content
Log in