गाव सारा
गाव सारा
1 min
6.9K
गाव सारा झोपलेला
चंद्र का रे कोपलेला
मोगऱ्याला गंध आला
भाव तमी लोपलेला
गार वारा मंद झाला
मोगरा रे चोपलेला
साव आता चोर झाला
मार माथी थोपलेला
घेत सारे सुख माझे
भार हाती सोपलेला
वृत्त- मनोरमा
लगावली- गालगागा गालगागा