शेतकरी
शेतकरी
1 min
7.2K
आम्ही कष्टाचे शेतकरी रे
खाई बसून कर्मचारी ---||धृ||
अख्या जगाचा पोशिंदा
दिन रात काम धंदा
कुणब्याच्या शेतावरी रे ----||
अंगी आमच्या फुटतो घाम
नसे याची कुणाला जानं
मिळवी कष्टाची भाकरी रे ----||
पिकवितो गहू हरभरा
ऊसावरती डोलतो तुरा
पोटालागी खाई बाजरी रे ----||
दुष्काळाचा मिळे रे भत्ता
गरीबांना नसे त्याचा पत्ता
नेम त्याचे धाब्यावरी रे ----||
कुणा सांगू माझे दुःख
नसे जगाला याची खंत
बाप लावी गळयाला दोरी रे ----||