Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वसान...
वसान...
★★★★★

© Raosaheb Jadhav

Inspirational

1 Minutes   253    8


Content Ranking

वसन


तशी त्याला नव्हती शिवली कधीच

पायजम्याची नाडी

अन प्रिय होती तितकीच

विरु लागल्या धोतराच्या अस्तराची गोधडी.....


पण आताशा शिवलीय त्याने धोतरपँट....


फिरू लागलेत कात्रीचेे पाते

त्याच्या नव्याकोऱ्या धोतरावरून

उघडझाप करणाऱ्या पापण्यांसोबत

लांबीचे करत तुकडे .....


तो करू पाहतोय बदल

लांबीचे लचांड सावरण्यासाठी

किंवा कदाचित त्याला

नाही पेलता येत काळाचे ओझे

धोतराच्या गाठोड्यात


मात्र आता हरवत चाललीय त्याची बोटे

मिऱ्या घालण्याचे कसब

आणि स्वीकारू लागलीत नवे तंत्र

भिंतीवरल्या इलेक्ट्रीक बोर्डाच्या भोकांमध्ये

इस्त्रीच्या वायरची टोके अचूक खोसण्याचे...

तसेही आता म्हणे तो,


आंगड्याच्या आत दडलेल्या कोपरीला

देणार आहे निरोप लवकरच...

पण सुटपॅन्टमध्ये शरीर गुंतवण्याचे धाडस

करत नाही तो अजून

आणि तसेही वखराच्या पासीत गुतलेले वसन

त्याला काढावे खुरप्यानेच अजून

म्हणून कदाचित....

वसान वसन वखराच्या पासीत

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..