Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Others

2  

Meenakshi Kilawat

Others

मृगजळ

मृगजळ

1 min
174


मृगजळाचा खेळ सारा 

सांजवारा जीवनात नाही  

दरवळणारा मातीगंध ही

कुठेच थांबत नाही ||

काळ कसला कोण जाणे

नकली ढोंगी याचकांचा

जनता इथे रडतेया पण

साथ घेती फक्त खुर्चिचा ||

कोण कैसा ओळखावा

आत काही बाह्य काही

आव असतोया खास परंतू

दिखाव्याने कोणी भूलत नाही ||

मोल भारी रूपयांचे चहूकडे

असल्यास आसमंती धाव घेतो

गरीब बिचारा पापपुन्याच्या

फेऱ्यात फसूनी लाजेनेच मरतो ||

संशयाची धूळ डोळ्यामध्ये

अशी कशी ही राजनीती

दुहेरी धोरणे व सत्ता लोलूपता

स्व:निष्ठाच वेशीला टांगती ||



Rate this content
Log in