Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

2  

Pandit Warade

Others

गोड वारसा

गोड वारसा

1 min
7.1K


    (अष्टाक्षरी)

आजा पणजाने दिला

गोड वारसा नातवा

आंबा चोखता चोखता

आजा पणजा आठवा

करा आठवण त्यांची

ज्यांनी देहा कष्टविले

राब राबून उन्हात

फळझाड वाढविले

त्यांनी लावलेले झाड

कसे डौलदार झाले

आले फळ चाखायास

नाही जिवंत राहिले

नाही मिळणार खाया

कधी मनात ना आले

नातवाच्या सुखामध्ये

सुख त्यांचे सामावले

किती दूरचा विचार

त्यांनी मनोमन केला

फळ अमृत चाखाया

मिळो माझ्या नातवाला

आज गिरवू आम्हीही

आजोबांचा धडा असा

देऊ पुढच्या पिढीला

आम्ही त्यांचाच वारसा

एक एक झाड लावू

जपू जीवापाड त्याला

त्याचा अमृत गोडवा

मिळो साऱ्या जगताला


Rate this content
Log in