शेतकरी.
शेतकरी.
शिरोमणी रचना...
शेतकरी
जगाचा पोशिंदा
कष्टाला मिळेना भाव
सुना गाव
बळीराजा
उन्हातान्हात राबतो
व्यापारी एसीत बसतो
शेतकऱ्यांच्या जिवावर ऐटीत जगतो
पिकाला
मिळेना हमीभाव
फक्त शब्दांचा डाव
राजकारणी सोडतात कागदी नाव
अवकाळी
मधेच शीळ
उराला काळजीचा पीळ
फुललेलं शिवार कोसळतं तिळतिळ
कष्टाळू
धरणीआईचं लेकरु
घामाच्या धारात भिजतो
निसर्गाच्या लहरीपणात कायम थिजतो
शेतकरी
मनाचा राजा
दरवेळी उडवून फज्जा
राजकारणी कोळून पितो लज्जा
बळीराजा
हो खंबीर
उपस कमरेचा खंजीर
तोडून टाक नैराश्याचे जंजीर
हरायची
नाही हिम्मत
कळूदे तूझी किंमत
पर्याय नाही तूझ्याशिवाय अंतिम
कृषीप्रधान
देशातला शेतकरी
आश्वासनांची फक्त हाळी
खूर्चीच्या स्वार्थापायी ठरतो बळी
खेदजनक,
कागदी पसारे
खोट्या योजनेंचे पिसारे
हवेतचं विरतात पोकळ सहारे