एक क्षण
एक क्षण
1 min
787
एक क्षण सुखाचा
गोड क्षणांनी गुंफलेला
आठवणीत असलेला
मधुर स्मृतींनी जपलेला
एक क्षण दुःखाचा
वास्तवाने होरपळलेला
नैराश्याने झपाटलेला
मायेने दुरावलेला
एक क्षण निशब्द
भावना हरवलेला
अस्तित्व विसरलेला
जाणीव नसलेला
एक क्षण चंचल
प्रलोभानी बहरलेला
मनाला मोह घालणारा
आतुर झालेला
एक क्षण निश्चल
स्तब्ध आणि स्थिर
हालचाल नसलेला
पण मृत्यूला कवटाळलेला