काळ्या आईचं सपान...
काळ्या आईचं सपान...
1 min
347
काळ्या मातीत हिरवाई बहरली,
धरणी माई लई सुखावली,
वेल वेल लगडली थोडी लाजून झुकली,
काळ्या आईच्या कुशीत थोडी सुखाने रडली,
पाणी आल रानी वनी गात मोटेवरची गाणी,
तरारली पुन्हा वेल झेप घेइ वरवर,
सूर्य आला घेउन मऊ रेशमी ते उन,
खुळ्या उनाड वाऱ्याची उगीचच भणभण.
त्याने केली भुणभुण ओल्या वेलीच्या कानात,
अन लाजेची हिरवाई आली हर एक पानात,
मग लगडली वेल कळ्यान फुलान,
फळ लागता फुललं काळ्या आईचं सपान !!