विषय - परग्रहवासी
विषय - परग्रहवासी
स्टोरी मिरर
स्पर्धेसाठी
कोण अवतरला हा परग्रहवासी
. पडे प्रश्न भूतलाच्या आदिमानवांना
. आला कुठून मी कसा अचानक
उलगडा त्यांना काहीच होईना
काठी, मशाल घेऊन हाती
मारण्यास धावले ते वनवासी
परग्रहवासी गप्प उभा असे तो
नाही फूका त्यांना घाबरलासी
भाषा त्यांची काहीच उमजेना
काय नि कसे सांगू या वनचरा
शिक्षणाच्या अभावामुळेच तर
होतोय संपर्कासाठी वाद खरा
केले हातवारे या मानवाने मग
मी उतरलो अंतराळ यानातून
भरकटले इकडे ते माझे यान
काढा बाहेर मला या संकटातून
केले हातवारे नि इशारे नवागताने
अवगत नसे हा परकीय निवासी
हाकलून देण्यासाठी उभे ठाकले
ते अडाणी ,निरक्षर आदिवासी
भारती सावंत