Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

नवं वर्षाच्या सर्वाना ...

नवं वर्षाच्या सर्वाना ...

1 min
7.6K


आयुष्य म्हणजे एक कोडं सुटता सुटत नाही

चांगलं काही करू पाहता उलटच घडत जात ...

वय जसं- जसं वाढत जात तसं, तसं शहाणपण येत जात 

तरीही ...आयुष्याचा गुंता मात्र सुटता- सुटत नाही  

हवीहवीशी वाटनाऱ्या माणसांचा सहवास लाभत नाही

झालं गेलं विसरून जाऊ ,पुन्हा नव्याने सुरुवात करू

विसरून सारी व्यर्थ भ्रमंती , पुन्हा गडे एक होऊ

जात - पात नकोच गडे माणूस बनून जगात राहू 

घर काय कधीही बांधता येईल 

मनातलं आभाळ कवेत घेऊ

उद्याच्या पोटाची काळजी कशाला ?

आभाळ पांघरू दगड उशाला 

मंगल समयी परस्परांच्या भावनांची कदर करू 

प्रेम देऊ - प्रेम घेऊ पुन्हा नव्याने एक होऊ सर्वार्थाने

कट - कारस्थाने सोडून सारे एक दिलान म्हणू

नवं वर्षाच्या सर्वाना लाख - लाख शुभेच्छा ! ..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational