Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

देश आपला,आपण देशाचे.गीत.

देश आपला,आपण देशाचे.गीत.

1 min
13.9K


देश आपला, आपण देशाचे

बालवीर आपण आदर्श भारताचे

देश महान सैनिकांचा, रक्षणकर्ता देशाचा

थोर महापुरुषांचा आणि अन्नादाते किसानांचा.


बालकवीर आदर्श घेऊ, पुन्हा, पुन्हा नवा

व्यसनमुक्ती साठी लढा देऊ मुक्त करण्यास मानवा

जगाला आपला हेवा वाटतो पाहून कार्याचा ध्यास

अंतराळात, भूगर्भात घडविला सत्याचा इतिहास.


सर्व भारतीय एक होतात राष्ट्रीय कार्य करण्यास त्यातूनच आपली प्रगती साधते देश विकास कार्यास

सर्वजन आपण शिकलो क्रांतीसूर्यांचा इतिहास

त्यांचा त्याग, आणि शौर्य देते प्रेरणा कार्य करण्यास त्यांच्या रक्तातून विचार स्फुरले भारत बालवीरांस .


क्रांतिकारक, या देशाचे खरे महान शिल्पकार

त्यांच्या बलिदानातून निर्माण झाले तेजस्वी विचार

नव्या पिढीला वाचवू शकतील संतांचे विचारधन

धन्य होईल आपले जीवन त्यांच्या आचरणातून .


न्यायासाठी आपण ठोकू जोराची आरोळी

अन्यायाला ठोकरून करू त्याची होळी

राष्ट्रभक्तीचे धडे शिकवू एकता अखंड राखण्यास

चैतण्याची ज्योत जागवू ,देऊ स्फूर्ती देशकार्यास .


Rate this content
Log in