Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

संत जीवन

संत जीवन

1 min
14.2K


उक्ती तैसी कृती ज्याची

संत तयाला म्हणावे

त्याच्या भजनी लागावे

त्याचे चरण वंदावे ।।


शुद्ध पवित्र जीवन

ज्याची नम्रतेची वाणी

स्वच्छ शुद्ध वृत्ती जसे

वाहे सरितेचे पाणी ।।


ज्यांच्या जीवनात नाही

कधी मत्सर कुणाचा

दोष झाकून शिष्याचे

उदो छोट्याशा गुणांचा ।।


जन कल्याण साधण्या

संत देहा झिजविती

सांगे हित उपदेश

साऱ्या लोकां जागविती ।।


संत सोडविती सारे

मोह मायेचे बंधन

नरदेहा मानिती जे

प्रभू प्राप्तीचे साधन ।।


जीव देवाचा, त्यावर

करी अनुपम प्रीती

संत साकव बनुनि

जीव शिवा भेटविती ।।


ईश्वराच्या कार्यासाठी

ज्यांचे झिजते चरण

भाग्य समजून जावे

ऐशा संताला शरण ।।


Rate this content
Log in