काय देऊ हिशोब तुला
काय देऊ हिशोब तुला
एक असणाऱ्या स्पदनाचा
काय देऊ हिशेब तुला
माझ्यात जे विरून जाते
धडधडते मात्र तुझ्यासाठी
एक असणाऱ्या श्वासाचा
काय देऊ हिशोब तुला
मी घेतो न घेता उडून जातो
चाफ्याच्या सुगंधापाठी
एक असणाऱ्या शब्दाचा
काय देऊ हिशोब तुला
अनंत भाव माझे
गुंतले आहेत तुझ्या ओठी