Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

उठबशी

उठबशी

1 min
374


सांग ना आई बोल ना

का अबोला माझ्याशी

काय झाला माझा गुन्हा

का काढू मी उठबशी?।।धृ।।


तुझा बाळ मी लाडका

मुळीच नाही चिडका

नाही माहीत मजला

कशी फुटली गं बशी?।।1।।


निजलेल्या तानुलीला

त्रास नको ना व्हायला

मारून एक चापटी

उडविली गं माशी।।2।।


भातुकलीचा खेळ तो

मी कधीच ना खेळतो

मी ना घेतली बाहुली

उगा रडते गं काशी।।3।।


आत्याबाईंची वेणी ती

आहे खरी का खोटी ती

कुतूहल वाटते मला

ओढून पाहिली जराशी।।4।।


शुभ्र लांब मिशीवर

आजोबा देती ना भर

खुशीत येऊन मीही

पिळली तिला काहीशी।।5।।


Rate this content
Log in