Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

हसरे रडू

हसरे रडू

1 min
1.2K


हसताना अवचित डोळ्यात तरळणारे

तुझ्या आठवणींच्या भूतकाळात मला रमवणारे

कधी कधी मनाच्या डोहात डुबणारे

माझ्या हुंदक्यांमध्ये अडकणारे

निसटणा -या वाळूत क्षण पकडणारे

हरवलेल्या वाटेत सापडणारे

कधी वाऱ्यावर फुलपाखरासारखे उडणारे

आकाशात तुटणार्या ताऱ्याप्रमाणे, काळजाला भिडणारे

क्षण क्षण जागवत तुझ्या अभावाने छळणारे,

विरहाचे अश्रू...दुःखाचे अश्रू...गळणारे अश्रू...

तुझ्याशिवाय अमृताचा थेंब सुद्धा कडू आहे

तुझ्याशिवाय माझे आयुष्य हसरे रडू आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance