श्रावण !!
श्रावण !!
1 min
14.7K
श्रावण महिना सूरु जाहला
आनंद दाटला चोहीकडे
क्षणांत येते नभी दाटुनी
क्षणांत लख्ख उजेड पडे
रिमझिम येती कधि जलधारा
कधि सोनेरी किरणांचे सडे
जलधारांच्या सुक्ष्म कणांनी
आकाशात झुले ईंद्रधनुचे कडे
हिरवी हिरवी झाली अवनी
चैतन्य बहरले सर्व कडे
वृक्ष पालवी घेऊन खुलले
पर्ण, फुलांचे पडले सडे
साद घालता पक्षी बोलती
बलाक पक्षी ऊंच ऊडे
आनंदाने मयुर थिरकतो
फुलवित पिसारा अलुवार उडे
उपवास धरोनी नटती ललना
निघती देवालया कडे
भजन, किर्तने करुनी परतती
आनंदे आपल्या घराकडे
श्रावण महिना सूरु जाहला
आनंद दाटला चोहीकडे