तू नसतांना
तू नसतांना
कशी उदासी येते मनाला तू नसतांना
झरा प्रेमाचा उरात माझ्या तू नसतांना ------ ||धृ||
जवळ असता सारखी कुरकूर
जीवास माझ्या लागे हुरहूर तू नसतांना ------||
उठता बसता नेहमी कटकट
मनास माझ्यालागे चटपट तू नसतांना -------||
कधी उठावे सदा कुटावे
दुःख त्याचे मज आठवावे तू नसतांना -------||
केव्हा रूसवे केव्हा फुगवे
माझ्या जीवाने मनी झुरावे तू नसतांना --------||
चंदना परी जीव झीजवावा
उगाळूनी सखे तुज लावावा तू नसतांना ------||
मी तरी का असे वागावे
मनास माझ्या कसे समजावे तू नसतांना ------||