माझे मन तुझे झाले
माझे मन तुझे झाले
जेव्हा पाहिले सख्या
माझे मन तुझे झाले
पहिल्याच भेटीत रे
प्रेम तुलाच अर्पिले !
नित्य त्या क्षणा क्षणाला
चैन माझे विसरते
भान हरपून वेडी
अशी बावरी होते !
धुंद मंद सुगंधित
रातराणी ही डोलते
वारा गायी सुरेल हे
गीत माझ्या रे प्रीतीचे !
आहे अजाण तू प्रेमा
नकळत मी हरखले
प्रेम वेडी राधा मी ही
माझी मीच हरवले !