Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shital Yadav

Inspirational Others

3  

Shital Yadav

Inspirational Others

निसर्गाशी नाते

निसर्गाशी नाते

1 min
7.1K


निसर्ग राजा

करी तुला अर्पण

काव्यगुंफण


पळसफुले

उधळण रंगांची

वसुंधरेची


वसंतोत्सवी

नवपालवी साजरी

सृष्टी बहरी


मोहक फुले

मधुबन बहरे

सौख्य भरे


श्रावणमासी

सरसर शिरवे

सारे हिरवे


इंद्रधनूची

सप्तरंगी कमान

हरपे भान


वृक्षारोपण

गरज ही काळाची

हिरवळीची


वन्य संपदा

वरदान ईश्वरी

धरतीवरी


बळीराजाचे

या निसर्गाशी नाते

जगी शोभते


संदेश हाच

करा वृक्ष जतन

सुखी जीवन


Rate this content
Log in