स्त्री जन्माची कहाणी
स्त्री जन्माची कहाणी
स्त्री जन्माची कहाणी
सारा दुःखाचा बाजार
झालं माहेर पारखं
ओढी सासरचा भार।।
ओवी गाते जात्यावर
नाव भावाच घेऊन
आळविते भाऊ राया
गीत मायेचं गाऊन ।।
तालीवार बंधु माझां
त्याचा अंगुराचा मळा
वाजे मोट कुही कुही
पाणी वाहे खळा खळा ।।
बाप माझां साधा भोळा
काम करीतो मोलाणं
उभा राही बांधावर
घाम पुशी रुमालाणं ।।
जन्म घेती माहेरात
लेक सासरी नांदते
सुखी ठेव माय बापा
देवा आयुष्य मागते ।।