बळी
बळी
1 min
236
बळीराज्याचा मुलगा
नोकरीसाठी शिक्तोय
हाती घेऊन पताका
गावोगावी फिरतोय ---- || १ ||
नाही आली दया-मया
पडे साहेबांच्या पाया
वरी आहे अधिकारी
लाख दोनं मागे खाया ----- || 2 ||
आशे पोटी ' बा ' ने
केला कर्जाचा डोंगर
किती फिरलं फिरलं
झाल सपान भंगुरं ----- || ३ ||
असं कसं हे शिक्षणं
सारं भिकेचं लक्षणं
असून वाघाचा बछडा
गेला शेळीच बनुन ------ || ४ ||
कलीयूगा मध्ये कसा
सारा घोटाळाच झाला
असून ' राजा ' हा जगाचा
असा कसा 'बळी ' झाला ------ || ५ ||