निर्भया
निर्भया
मी धिक्कार करतो, मी निषेध नोंदवतो
पुरुष मी नर-पशूंचा बहिष्कार करतो.
कलंक पौरुषत्वाला ते बलात्कारी जे,
ह्या अत्यचारींना हद्दपार करतो.
लाज वाटे मला वाट चालताना
पुरुषार्थ बुडवणार्यास आज बुडवतो
साशंक या नजरा रोखून पाहतात
मान माझी झुकवी त्यालाच झुकवतो
श्वास मोकळा आता घेइन तेव्हा
दंडीत होइल जेंव्हा मस्तवाल तो