असे जगावे
असे जगावे
1 min
385
असे जगावे आपण
हेवा साऱ्यांना वाटावा
नको दुजाभाव मनी
हर्ष सर्वत्र पेरावा
व्हावे सुंदर सारेच
धन माझेही शब्दांचे
नको उरात भावना
द्वेष मत्सर लोभांचे
दीप होऊनी प्रकाश
जगी सर्वत्र मिळावा
वाती सम जळतांना
मार्ग सत्याचा कळावा
पेटवून रे शब्दांनी
व्हावी सारीच क्रांती
असू द्यावी हृदयातही
जगतांना थोडी भक्ती