Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

देह दान

देह दान

1 min
7.7K


मी गेल्यावर मला कधीच

त्याचे वाटणार नाही दुःख

माझे प्रेत जाळण्या आधी

देह दानात मिळेल सुख ।।

न कळत होत असे पाप

तसे पुण्य कधी होत नाही

देह दानातून जीवनात मी

पुण्याची करतो भरपाई ।।

देहाची या करुन माती

मला नाही मिळणार शांती

माझ्या अवयव दानानेच

उजळेल दोन जीवाची नाती ।।

पार्थिव माझे जाळून कुणा

काहीच नाही मिळायचं

करा माझे दोन्ही नेत्रदान

हे जग पुन्हा न्याहाळायचं ।।

अवयव दान करणे हेच

श्रेष्ठ दान मानले आहे

आयुष्याच्या कल्याणाचे

हेच तर मोठे फळ आहे ।।


Rate this content
Log in