Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Tragedy

1  

Pandit Warade

Tragedy

माणसाचा मान

माणसाचा मान

1 min
1.2K


काळजाशी माणसाचा मान आहे

माणसाची हीच मोठी शान आहे


प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, सूत्र नामी

जीवनाचे हेच मोठे ज्ञान आहे


माणसाने माणसाला ओळखावे

आज का माणूस हा बेभान आहे


कोवळ्या ऐशा कळीला का खुडावे

ठेव ध्यानी तू तिची संतान आहे


प्रेम गेले, भान गेलं, घात झाला

जागला का आत हा सैतान आहे


Rate this content
Log in