गरीबी
गरीबी
1 min
185
आता होईल सकाळ
उठ उठ माझ्या बाळा.
आता कर लगबग
नको करुस कंटाळा.
जावे लागेल कामाला
पैका जरा मिळवाया.
तर मिळेल भाकर
पोटासाठी थोडी खाया.
ऊन वारा थंडी पाणी
सतावती बघ उगा.
काम तयांचे ते करती
करू नकोस तू त्रागा.
पेटवली शेकोटी ही
पळवाया तुझी थंडी.
नाही घेऊ शकत मी
तुला स्वेटर नि बंडी.
घेई समजून मला
गरीबीने मी लाचार.
नाही मी सधन जरी
प्रेम करते अपार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक रचना माझी
शीला अम्भुरे बिनगे
(साद)
परतुर, जालना