बेधुंद हवा
बेधुंद हवा
पहाट झाली तांबडं फुटलं, थंडगार ही हवा।
प्रीत पाखरा तुला दाविते, किती
सुरेख सुटली हवा।।
या हो धनी, वाढला, वाढला रांनचा गारवा।।धृ।।
मी एकटीच राणी, तुम्ही माझं धनी।
पाहुनिया इथं कसं, येईल हो कोणी।।
समजून घ्याना राया, मला आडरानी।
पहाटेच स्वप्न माझं, मला जाग करा कोणी।।१।।
शहारला अंग माझं, लाजली तनु ही।
स्वप्नात माझ्या, कसे पहिले तुला ही।।
गालावरली खळी ही, गोड हसली गं।
स्पर्शात तुझा मी, श्वास रोखला गं।।२।।
आरक्त गाली, फुले धुंद झाली।
डोळ्यात तुझिया मी, प्रीत पहिली।।
टंच बहरलेली, तुझी गुलाबी जवानी।
आले मनात माझ्या, चल जाऊ राणी।।