सलाम त्या पाठीराख्याला!!
सलाम त्या पाठीराख्याला!!
जन्म गेले शेतात
नाते घट्टावले पिकांशी
मरण उभे समोर
अंत त्या मातीत
डोळे मिटूनी
श्वास सुटूनी
सलाम त्या पाठीराख्याला!
ठसे उमटले पायाचे
त्या मातीच्या गंधात,
बालपण उमजले
गावातल्या वनात
धीट होऊन,
मन बुलंद होऊन
सलाम त्या पाठीराख्याला!
किती ऊन आले
सावलीच्या घरात,
हजार पाऊस पहिले
या दुष्काळाच्या वेळात
नाळ आज तुटुनी,
शेवट होउनी
सलाम त्या पाठीराख्याला!
डोक्यावर फेटा
त्या मातीच्या मानाचा,
पोटात भूक
न्याय हाच जगाचा
पेटली ती चूल
मुकली ती वेळ
सलाम त्या पाठीराख्याला!
काळोख जाहला
पेटत्या दिव्यापाशी
स्वार्थी जगात
असा गडी होणे नाही
स्वर्ग ही रडून
शेवट होऊन
सलाम त्या पाठीराख्याला!