रे माणसा
रे माणसा
1 min
13.9K
का असा झोपला जाग रे माणसा
माणसा सारखा वाग रे माणसा
लाभला जन्म हा माणसाचा तुला
त्यास का लावसी डाग रे माणसा
माय बापा परी देव नाही दुजा
का तयांचा तुला राग रे माणसा
वाटते चांगले या जगी पाहिजे
चांगले वागणे भाग रे माणसा
चालतो बोलतो ईश्वराची कृपा
पायरीशी तरी लाग रे माणसा