Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Tragedy

2.5  

Pandit Warade

Tragedy

तू नसतांना

तू नसतांना

1 min
6.9K


उदास भासे जगात सारे तू नसतांना ।

भकास झाले घरात सारे तू नसतांना ।।


तुला स्मरावे बागेमधले फूल पहाता ।

फुलास येती सुवास न्यारे तू नसतांना ।।


मनास वाटे पाऊस ल्यावा मस्त फिरावे ।

नकोच वाटे पाऊस वारे तू नसतांना ।।


तनूस माझ्या प्रसन्नता ये तुझिया स्पर्शे ।

असे आज का भरे कापरे तू नसतांना ।।


क्षणक्षणाने फुलून जावे तू असतांना ।

युगापरी हा क्षणेक भासे तू नसतांना ।।


कुणास सांगू मनी दाटल्या भावभावना ।

कुठे करावे मना मोकळे तू नसतांना ।।


जगात झाली बरीच गर्दी त्यात नसे तू ।

कुणास आता "माय" म्हणावे तू नसतांना ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy