Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
14.3K


ऊरी समर्पण भाव

काळजात कळवळा

नयनाच्या पापणीत

माय सांभाळते बाळा..१


एक कळी गुलाबाची

संसाराच्या वेलीवर

तिच्या जीविताचा भार

एकटीच्या जीवावर ..२


नका समजू अबला

दुर्गा चण्डिका बनते

वेळ प्रसंगी वाघीण

हाती शस्त्रही धरते ...३


बाळ कडेवर घेई

विळा हाती धारदार

क्रोध अंतरी पेटला

डोळे ओकती अंगार ..४


नाही शरीराचे भान

केस तिचे विस्कटले

कुंकू कपाळीचे तिचे

नाकी तोंडी पसरले ..५


नियतीच्या आघाताने

नाही खचून जायचे

लाख संकटे येवोत

हिमतीने झुंजायचे .....६


बाळकडू देते माय

संगे घेऊन बाळाला

सदा खंबीर बनून

लेकी हरव काळाला ..७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational