सर पावसाची वेडी
सर पावसाची वेडी
सर पावसाची जरा झालीसे वेंधळी
थेंब पावसाळी कसे आले ओघळूनी
मेघ दाटूनी येता निळ्याशार या नभी
मन वढाय होई ओले चिंब पावसाळी
धारा पावसाच्या भरूनी घे ओंजळी
मन मोरपिसि नाचते स्वछंदी अंगणी
पाऊस धारा वाहता माझिया अंगणीत
आसवांच्या धारा वहाती या ओंजळीत
पावसाच्या या ओल्याचिंब बरसती सरी
मनी काहूर माजाते येता आठवण ती जुनी
बहाणे ते नित्य नवे भिजायचे मन त्यासवे
पावसाच्या हलक्या सरी मन झुले तयासवे
पापणीत सर भिजे आठवणीच्या ओल्या सरी
मेघाच्या मनी दाटे काहूर सर पावसाची सांगते