Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

चि. अक्षरास...

चि. अक्षरास...

1 min
240


चि. अक्षरास...


अक्षरा तू साक्षर हो

माती मती देईल बळ

होशील मोठा दिसामासा

मातीसोबत थोडा खेळ...


अक्षरभेट तुझ्यासाठी

गाठी जपले गावठी दाणे

पेरण्यासाठी ठोक आरोळी

मातीला मग घाल उखाणे...


झेलण्यासाठी सूर्य नवे

आभाळाचे कर झेले

साठवण्याला चंद्र हळवे

पोटी सागर जप ओले...


हरळीसारखा वेली जा

खड़न हो खड्यासारखा

टेकण्यासाठी पारंब्यांना

राखण्या माती तुझा वसा...


अक्षर अक्षर वेचत जा

आशीर्वाद तर पायलीपसा

उद्याच्या पण पेरणीवर

असला पाहिजे तुझा ठसा...


-रावसाहेब जाधव.


Rate this content
Log in