पाऊस आला
पाऊस आला
तो आला अन्
मी मोहरले.
स्पर्शाने त्याच्या
तनमन शहारले.
आसमंत सारा
झाहला धुंद धुंद.
भुलवितो मनास
मातीचा सुगंध.
चिंब भिजल्या
तरुवर वेली.
कोरडी धरती
सुखात न्हाली.
पानेफुले कशी
हसती, गाती.
खुशीत डोलली
गवताची पाती.
आला रे आला
पाऊसराजा.
धडाडधुम
ढगांचा बाजा.