Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Tragedy

3  

Trupti Naware

Tragedy

दुष्काळ एक समस्या

दुष्काळ एक समस्या

1 min
436


एकदा मी दुष्काळ पडताना पाहीला

एकदा मी दुष्काळ रडताना पाहीला

भेगाळलेल्या जमीनीतुन वाकुन बघताना पाहीला

आटलेल्या नदीतुन हरवताना पाहीला

आषाढात सरींना विनवताना पाहीला

रुक्ष,कोरड्या फांदीवरुन तुटताना पाहीला

शेतकऱ्यांच्या डोळ्यात भिजताना पाहीला

जनावरांच्या देहातून मरताना पाहीला

असा दुष्काळ मी जवळुन पाहीला

निसर्गाशी वाद होता ..

उपासनेतुन मिटताना पाहीला

थेंबथेंब बरसले तेव्हा ..

भिजुन,गारठलेला हसताना पाहीला

मावळतीच्या सुर्यासारखाच तोही

शुन्यातुन नवे विश्व घडवताना पाहीला !!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy