आवाजाची ओळख
आवाजाची ओळख
चिमणी करते
चिव चिव चिव
बाळाला म्हणते
मला शिव शिव
कावळा करतो
काव काव काव
बाळाला म्हणतो
माझ्यामागे धाव
मांजर करते
मिऊ मिऊ मिऊ
बाळाला म्हणते
दोघे दूध पिऊ
कोंबडा करतो
कसा कुकूचकु
बाळाला म्हणतो
दाणे दे तूच तू
गोठ्यातली गाय
करी हम्मा हम्मा
बाळाला म्हणते
नाच छम्मा छम्मा.
हिरवा पोपट
करी मिठू मिठू
बाळाला म्हणतो
जेव गुटुगुटु.
बाळाची आई
गाते हो अंगाई
बाळाला म्हणते
नीज गाई गाई.