Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Mangesh Medhi

Abstract

2  

Mangesh Medhi

Abstract

ह्या पाऊसकाळी

ह्या पाऊसकाळी

1 min
7.1K


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन भुलते हरवते

रानावनात फ़ुला पानात

दरी खोऱ्यात, दूर पहाडात


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन वाहते झेपावते

नदी नाल्यात मुक्त झऱ्यात

गंधात, स्वैर वाऱ्यात


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन पसरते विसावते

हिरवाईत डोहात

पाऊल वाटेत, डोंगर रांगात


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन गुंतते रुतते

वेली वेलीत गच्च मातीत

शिंपल्यात, रेती काठात


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन नाचते थिरकते

थेंबा थेंबात पाखरात

मोर पायात, पंखात


ह्या पाऊसकाळी पाऊसकाळी


मन फुलते बहरते

रान फुलात वनराईत

झाडा झुडपात अंकुरात


Rate this content
Log in