दान धर्म
दान धर्म
1 min
498
करा दान धर्म / दीन दुबळ्यांना ।
गोर गरीबांना / कधी तरी ।।
मुक्या प्राण्यावर / करावी रे दया
करोनिया माया /मनोभावे ।।
माय रे बापाची / करावी रे सेवा
मिळे मग मेवा / पुण्यातून ।।।
गाय ती रे माता / भारत देशाची
तान्ह्या वासराची / आई असे ।।
लुळ्या पांगळ्यांना / करा दान धर्म
वाईट ते कर्म / मानु नये ।।
मंदिर मठात / असे भोंदू साधू
काही संधी साधू / लुटतात ।।
दान रे धर्माचा / नाही रे जमाना
भूलवी लोकांना / उजेडात ।।