Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

माझे प्रेम असते

माझे प्रेम असते

1 min
7.2K


रात्री आकाशात गवसत असताना

तुटलेल्या ताऱ्यात मनातले मागतेस

मागितलेली गोष्ट आता हमखास मिळणार या आनंदात धाऊन जातेस

तेव्हा हलकेच मागे वळून बघ

त्या तुटलेल्या ताऱ्यात माझे प्रेम असते

गुलाबाच्या सुगंधाने मोहून जातेस

पाकळ्या पाकळ्यात गूज उलगड राहतेस

तो माझा की मी त्याची मनाचे कोडे सोडवत राहतेस

तेव्हा होकाराच्या पाकळीला हलकेच ओठांचा स्पर्श कर

त्या पाकळीच्या सुगंधात माझे प्रेम असते

वाऱ्यावर भुरभुरणारे केस हलकेच सावरतेस

अवचित उडाली ओढणी की बावरतेस

ओढणी सावरू की वेणी या भ्रमात वाऱ्याला देतेस दोष

तेव्हा हलकेच वाऱ्याला गालावर अनुभवून बघ

ती स्पर्शाची हुरहूर म्हणजेच माझे प्रेम असते


Rate this content
Log in