उन्हातला पाऊस ( काव्यांजली )
उन्हातला पाऊस ( काव्यांजली )
उन्हातला पाऊस
अस्वस्थ करुन गेला
पुन्हा दाटला
नयनात
काहुर माजवी
का उन्हातला पाऊस ?
भासते निरस
इंद्रधनुष्य
भेट व्हावी
तिची मनी आस
उन्हातला पाऊस
एकटाच
आठवणी उजाळत
आज निवांत पाहीला
असा उन्हातला
पाऊस
उन्हातला पाऊस
अवचित सदा पडे
का रडे ?
उगाच