ओंजळीत अभंग रचना
ओंजळीत अभंग रचना
दिसत असून I घेता येत नसे ॥
विटाळे ते कसे? I पाणी बरे ॥१॥
स्पृश्य नि अस्पृश्य | भेदभाव कसा ?॥
प्रश्न पडे असा I या भिवाला ॥२॥
लढा समतेचा I केला मग सुरू ॥
दृढ महामेरू | निश्चयाचा ॥३॥
महाडचे पाणी I जनावरे पिती ॥
अस्पृश्य मरती | तहानेने ॥४॥
दिली मग हाक | बाबासाहेबांनी ॥
आले क्रांती दिनी I एक संघ ॥५॥
जण सागर तो I पाणी ते पेटले ॥
चवदार केले I ओंजळीत ॥६॥